Skip to main content

Bird conservation: Red Wattled Lapwing

माळटिटवी किंवा पिवळ्या गाठीची टिटवी (yellow wattled lapwing)

भारतामध्ये टिटवीच्या एकूण दोन जाती आढळतात. त्यातली एक जात म्हणजे माळटिटवी तिला पण पिवळ्या गाठीची टिटवी पण म्हणतो.या माळ टिटव्या कोरड्या प्रदेशातील माळरानावर पण पाण्याच्या आसपास आढळतात. यांना आपली हद्द खूप प्रिय असते आणि त्यासाठी त्या इतर पक्षाबरोबर आणि मोठ्या प्राण्यांनाही हुसकून लावतात. हे पक्षी नेहमी जमिनीवर आढळतात आणि तुरू तुरू पळत जाऊन मातीतील किंवा पानाखाली दडलेले किटक पकडून खातात. टिटवीचा विणीचा हंगाम उन्हाळ्यात असतो. नर मादीची जोडी जमल्यावर त्यांचे मीलन होते आणि मादीआणि नर मिळून जमिनीवर घरटे तयार करतात. या घरट्यात मादी चार अंडी घालते. यांच्या पंखाचा आणि पाठीचा रंग मातकट तपकिरी असून पोट मात्र पांढरेशुभ्र असते. मला एक खूप वेगळे प्रकारचे वर्तन मागे पावसाळ्यामध्ये दिसून आले.जुलैमध्ये आम्ही जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर येथे आमचे एक वडिलार्जित माळरान आहे. तिथे गेलो होतो. लगबग चार-पाच एकर ती जमीन आहे. खूपच कोरडी आणि खडकाळ जागा आहे. नजर जाईल तिकडे फक्त दगड आणि माती तिथे गेल्यानंतर मला या टिटव्या ओरडताना दिसल्या. कुतूहल म्हणून मी त्यांच्या मागे मागे गेले. त्या अजिबात ती जागा सोडून दूर नाही गेल्या. त्या तिथेच भिरभिरत होत्या. जरासे पुढे जाऊन पाहिलं तर एक सुंदर घरटे आणि त्यात चार अंडी दिसली. ते पाहून मला खूप आनंद झाला कारण मी ते सगळे पहिल्यांदा पाहत होते. घरटं खूप वेगळ्या पद्धतीने बांधलं होतं. छोटा खड्डा होता बशी सारखा. त्या भोवती छोटी-छोटी गोल दगड आणि त्यामध्ये छानस गवतं अंथरले होतं. पिवळसर पांढरी तपकिरी ठिपके असलेली चार अंडी होती. थोड्या वेळाने पाऊस चालू झाला. मला खूप वेगळ्या प्रकारचे वर्तन त्या टिटव्या कडून पाहायला मिळाले.एक टिटवी अंडी उबवण्याची काम करत होती. आणि तिचा जोडीदार तिच्या अवती भोवतीच फिरत होता. तो आम्हाला दिसत नव्हता पण आवाज येत होता. तितक्यात काय झालं पाच-सहा कुत्र्यांचा कळप तिथे जवळ आला तेवढ्यात टिटवी जोरा मध्ये आरडाओरडा करत त्यांच्या दिशेने पळायला लागली. तिचा कर्कश आवाज ऐकून तिचा जोडीदारही तिथे दाखल झाला आणि काय आश्चर्य त्या दोघांनी त्या कुत्र्याच्या कळपाला त्या घरट्याच्या विरुद्ध दिशेला हुसकावून लावलं. त्यांनी घरट त्यांच्या नजरेस ही पडू दिलं नाही.खूप आश्चर्य वाटले हे पाहून किती समर्पणाची भावना आपल्या पिल्लांसाठी आणि किती ती जपणूक…

 आज कितीतरी पक्षी असे आहेत ज्यांचं संवर्धन आणि संरक्षण करणे हे आपल्या सामान्य नागरिकांचे काम आहे..पक्षी संवर्धनाचं काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत पण त्यांच्यामध्ये लोकसहभाग सुद्धा तेवढाच आवश्यक आहे त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून आपण आपल्या परिसरातील पक्षांच्या संवर्धनाचं काम करूया.

नंदा जगताप(सहा.प्राध्यापिका,) प्राणिशास्त्र विभाग, दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज दापोली. जिल्हा रत्नागिरी.

 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

  Let’s talk on Birds: All vertebrates on this earth fall into two classes: warm-blooded animals and cold-blooded animals. The body temperature of warm-blooded animals is constant. The surrounding environment had no effect on their temperature. These animals are subdivided into mammals and birds. Mammals are those who have hair on their bodies, who give birth to puppies and feed them milk; so the birds have feathers on their bodies, they lay eggs and hatch the eggs with their body heat. Birds are easy to define. Birds are the only animals in the world that have feathers. Birds are commonly seen flying, building nests and laying eggs, so it is believed that all birds are the same. But on closer inspection, these birds have different shapes and are not the same as other birds. An example of this is the hummingbird, which is as sweet as the thumb of a human hand, and the ostrich, which is as big as a horse's hooves. Birds that fly thousands of miles, and penguins that never leaves...
  Bird series Shikra :( Bahiri Sasana) 1. Marathi name:         Shikra (Bahiri Sasana) 2. English name:        Shikra 3. Size:                       30 to 34 cm. 4. Weight:                  130 Gms. Information – Shikra Bird: The English name of this bird is so popular that it is known as Shikra. It is a species of bird of prey. It is also known as Bahiri Sasana in the Marathi language mainly found in sparse forests, in rural areas, and in farmland. Birds like Bulbul, Jungle Babbler, Bee-eater, Myna, Dove when seeing this Shikra they start flying in panic conditions and make warning sounds to alert other birds. After such an incidence, if you look closely, you can see this shikra fluttering its round wings and waving sl...
  साप तथ्य आणि मिथक शिव भारतीय पुराण आणि हिंदू धर्मात साप एक शक्तिशाली प्रतीक आहे. सापाची ( ' नाग ' ज्याला सामान्यतः हिंदी भाषेत म्हटले जाते) देशभरातील लोक त्याची पूजा करतात. यातील काही पौराणिक सापांना ‘ संरक्षक ’ मानले जाते , तर काहींना ‘ विध्वंसक ’ मानले जाते. भारतीय देव भगवान शिवाचे चित्र त्याच्या गळ्यात कोब्राशिवाय अपूर्ण आहे . दुसरा भारतीय देव , भगवान विष्णू , सात डोक्याच्या सापावर विसावला आहे. भारतीय कथांमध्ये पौराणिक शक्ती असलेल्या सापांचे शेकडो संदर्भ आहेत. यामुळे साप भारतीय संस्कृतीत एक शक्तिशाली प्रतीक बनला आहे. परंतु देशात पसरलेल्या सापांभोवती हजारो श्रद्धा आणि समज आहेत , जे दिशाभूल करणारे आहेत. यातील बहुतांश मिथक सर्पप्रेमींनी पसरवले आहेत. त्यापैकी काही दंतकथा आता दूर करण्याची संधी आम्ही घेऊ इच्छितो.   मान्यता: साप दूध पिते. वस्तुस्थिती: साप पाणी पितो आणि दूध पित नाही , ते नीट पचवू शकत नाही. ते सरीसृप आहेत आणि दुधाशी त्यांचा संबंध नाही , फक्त स्तन ग्रंथी असलेले सस्तन प्राणी दूध तयार करू शकतात आणि अशा प्रकारे सस्तन प्राण्यांमध्ये दुधाला आवडण्याची शक्यता...