Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

Bird conservation: Red Wattled Lapwing

माळटिटवी किंवा पिवळ्या गाठीची टिटवी ( yellow wattled lapwing) भारतामध्ये टिटवीच्या एकूण दोन जाती आढळतात . त्यातली एक जात म्हणजे माळटिटवी तिला पण पिवळ्या गाठीची टिटवी पण म्हणतो . या माळ टिटव्या कोरड्या प्रदेशातील माळरानावर पण पाण्याच्या आसपास आढळतात . यांना आपली हद्द खूप प्रिय असते आणि त्यासाठी त्या इतर पक्षाबरोबर आणि मोठ्या प्राण्यांनाही हुसकून लावतात . हे पक्षी नेहमी जमिनीवर आढळतात आणि तुरू तुरू पळत जाऊन मातीतील किंवा पानाखाली दडलेले किटक पकडून खातात . टिटवीचा विणीचा हंगाम उन्हाळ्यात असतो . नर मादीची जोडी जमल्यावर त्यांचे मीलन होते आणि मादीआणि नर मिळून जमिनीवर घरटे तयार करतात . या घरट्यात मादी चार अंडी घालते . यांच्या पंखाचा आणि पाठीचा रंग मातकट तपकिरी असून पोट मात्र पांढरेशुभ्र असते . मला एक खूप वेगळे प्रकारचे वर्तन मागे पावसाळ्यामध्ये दिसून आले . जुलैमध्ये आम्ही जयसिंगपूर , जिल्हा कोल्हापूर येथे आमचे एक वडिलार्जित माळरान आहे . तिथे गेलो होतो . लगबग चार-पाच एकर ती जमीन आहे . खूपच कोरडी आणि खडकाळ जागा आहे . नजर जाईल तिकडे फक्त दगड आणि माती तिथे गेल्यानंतर मला या टिटव...